अ‍ॅपशहर

पेपर टाकणाऱ्याच्या मुलाला दहावीत १०० टक्के!

देवरुख विभागातून वृत्तपत्राची पार्सले टाकणारे दिनेश बोडकर यांचा मुलगा दुर्वेश बोडकर याने दहावीत १००%गुण मिळवत साडवलीच्या कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. दुर्वेशने याआधी ७वी शिष्यवृत्ती परीक्षेत, तसेच एनएमएमएस परीक्षेत यश मिळवले होते.

Maharashtra Times 13 Jun 2017, 10:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । देवरुख
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ssc result 2017 son of newspaper vendor gor 100 in ssc
पेपर टाकणाऱ्याच्या मुलाला दहावीत १०० टक्के!

देवरुख विभागातून वृत्तपत्राची पार्सले टाकणारे दिनेश बोडकर यांचा मुलगा दुर्वेश बोडकर याने दहावीत १००%गुण मिळवत साडवलीच्या कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. दुर्वेशने याआधी ७वी शिष्यवृत्ती परीक्षेत, तसेच एनएमएमएस परीक्षेत यश मिळवले होते.

क्रिकेट खेळात तसेच चित्रकलेत त्याला विशेष आवड आहे. दहावीनंतर आपण सायन्स साईडला जाणार असल्याचे त्याने नमूद केले. आई-वडील, शाळा, शिक्षक तसेच बोंद्रे क्लास यांचा श्रेयात वाटा आहे. वेळापत्रक आखून नियमित अभ्यास केल्याने व वाचनावर भर दिल्याने यश मिळवता आले असे दुर्वेशने सांगितले. संगमेश्वर तालुक्यात प्रथम आलेल्या दुर्वेशला गणितात १०० व विज्ञानात ९९गुण मिळाले आहेत.

वडील दिनेश बोडकर हे मेहनती असून सर्व वृत्तपत्राची पार्सल गाडीतून पाठवणे तसेच घरोघर वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करतात. दुर्वेशच्या यशाने मेहनतीचे चीज झाल्याचे दिनेश बोडकर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज