अ‍ॅपशहर

रत्नागिरीत वृक्षारोपण महोत्सव

रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वन महोत्सव साजरा केला जाणार आहे. वन महोत्सवांतर्गत जिल्ह्यात प्रशासनामार्फत १ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड केली जाईल.

Maharashtra Times 1 Jul 2016, 12:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tree plantation in ratnagiri
रत्नागिरीत वृक्षारोपण महोत्सव


रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वन महोत्सव साजरा केला जाणार आहे. वन महोत्सवांतर्गत जिल्ह्यात प्रशासनामार्फत १ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड केली जाईल.

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के भागाचे वनीकरण होणे आवश्यक आहे. मात्र राज्यात फक्त २० टक्के भागातच मोठ्या प्रमाणावर वृक्ष आहेत. या परिस्थितीत बदल व्हावा आणि वनीकरणातून पर्यावरणाचा समतोल साधता यावा यासाठी सरकारच्यावतीने जिल्ह्या-जिल्ह्यांतून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारच्या या कार्यक्रमाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे. राज्यात २ कोटी वृक्षांची लागवड केली जाईल. यातील किमान १ कोटी ६५ लाख वृक्ष रत्नागिरी जिल्ह्यात असतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज