अ‍ॅपशहर

विजय नारकर यांचे निधन

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील मातृमंदिर या संस्थेचे कार्याध्यक्ष विजय नारकर उर्फ भाऊ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. नारकर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार त्यांचे पार्थिव चिपळूणच्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मंगळवारी दुपारपर्यंत अनेकांनी अंत्यदर्शन घेतले.

Maharashtra Times 12 Oct 2016, 1:26 am
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील मातृमंदिर या संस्थेचे कार्याध्यक्ष विजय नारकर उर्फ भाऊ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. नारकर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार त्यांचे पार्थिव चिपळूणच्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मंगळवारी दुपारपर्यंत अनेकांनी अंत्यदर्शन घेतले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijay narkar dies
विजय नारकर यांचे निधन


नारकर गेले काही दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांना मातृमंदिर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मुलाचेही काही वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मातृमंदिरच्या कार्यकारिणी सदस्य शांता नारकर आहेत.

१९६९मध्ये विजय नारकर मातृमंदिरच्या कामात सहभागी झाले व अखेरपर्यंत तेथे कार्यरत होते. देवरुख परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांनी समाजोपयोगी कामे केली. लोकसहभागातून १००हून अधिक गावांमध्ये त्यांनी पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या. त्यांच्या काळात मातृमंदिरचे कार्यक्षेत्र व्यापक झाले. रुग्णालयासोबतच गोकुळ हे अनाथ मुलींचे वसतीगृह, आयटीआय, कृषी कॉलेजही सुरू झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज