अ‍ॅपशहर

'नाट्यमंदार'चे निर्माते राजाराम शिंदे यांचे निधन

पत्रकार, नाट्यलेखक, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आणि नाट्यमंदार संस्थेचे निर्माते राजाराम शिंदे यांचे चिपळूनमधील होरी या गावी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राजाराम शिंदे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले.

Maharashtra Times 10 Dec 2016, 11:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम writer rajaram shinde no more
'नाट्यमंदार'चे निर्माते राजाराम शिंदे यांचे निधन


पत्रकार, नाट्यलेखक, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते, माजी आमदार आणि नाट्यमंदार संस्थेचे निर्माते राजाराम शिंदे यांचे चिपळूनमधील होरी या गावी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राजाराम शिंदे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले.

’मंदार’ नावाच्या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.

निराधार विद्यार्थी संघटना, गरजू गिरणी कामगार संघटना, नाट्यमंदार नावाची नाट्यसंस्था वगैरे निर्माण करणारे राजाराम शिंदे हे राजाराम शिंदे कनिष्ठ महाविद्यालय नावाच्या शिक्षण संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. राजाराम शिंदे यांनी ’दोन कोटीचा माणूस’ या नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे.


राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. तसेच रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी ’रंगभूमी सहकारी गृहनिर्माण संस्था व ’रंगदेवता सहकारी पतसंस्था निर्माण केल्या. शिवाय त्यांनी 'चित्रमंदार' ही चित्रपट निर्मिती संस्थाही काढली.


राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य


१९७८ मध्ये राजाराम शिंदे हे चिपळूण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा २०-कलमी कार्यक्रम, रत्‍नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे राबवला होता. चिपळूण तालुक्यासाठी त्यांनी मुंबईत ’ग्राम सुधारणा केंद्र’ ही संघटना स्थापन केली. त्यांनी नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या. शिंदे हे महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर अनेक वर्षे सदस्य होते. मराठी रंगभूमीबरोबरच देशातील सर्व भाषांच्या रंगभूमींच्या संशोधनासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा ’यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल आणि रंगभूमी संशोधन केंद्र’ हा प्रकल्प उभारला आहे.

हि श्रींची इच्छा, तरुण तुर्क म्हातारे अर्क, सौजन्याची ऐशी तैशी आदी नाटके


सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी वाहिली श्रद्धांजली

'शिक्षण, कला राजकारण यात प्रभावी कार्य करणारे राजाराम शिंदे हे कोकणचे सुपुत्र होते. त्यांचे निधन मनाला दु:ख देणारे आहे. मराठा समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या राजाराम शिंदे यांना माझी विनम्र श्रद्धांजली!'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज