अ‍ॅपशहर

'परत या, परत या एकनाथ शिंदे परत या'; राज्यभरातून शिवसैनिकांची भावनिक साद

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरत एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी भावनिक साद घालण्यात येत आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2022, 1:21 pm
सांगली : "परत या, परत या" एकनाथ शिंदे परत या अशी साद सांगलीतील शिवसैनिकांनी घातली आहेत. शहरामध्ये शिवसैनिकांनी एकत्र येत बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेत यावं, अशी भावनिक साददेखील घातली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde


राज्यातील आघाडीच्या सरकार अस्थिर झालेला आहे. शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांचे केलेल्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, सांगलीमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना थेट परत येण्यासाठी साद घातली आहे.

आम्ही शिवसेनेसोबत! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक रस्त्यावर, औरंगाबादमध्ये निदर्शने
बंडाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतल्या शिवसेनेच्यावतीने शहरातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्याच बरोबर शिवसैनिक ठाकरे यांच्या सोबत राहील, अशी भूमिका जाहीर करत बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे आवाहन करत, "परत या, परत या एकनाथ शिंदे परत या, अशी घोषणा देत एकनाथ शिंदे यांना पुन्हा परतण्याची साद घातली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज