अ‍ॅपशहर

रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ते गोपीनाथ मुंडेंचा विश्वासू शिलेदार; मंत्री सुरेश खाडे यांचा राजकीय प्रवास

Suresh Khade BJP : सुरेश खाडे यांनी १९९९ ला जत राखीव मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

| Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 1:12 pm
सांगली : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सांगली जिल्ह्याला सुरेश खाडे यांच्या रुपाने मंत्रिपद मिळालं आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार खाडे यांची मंत्रिपदाची ही दुसरी टर्म आहे. २०१९ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये त्यांनी काही महिने मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता खाडे यांना दुसऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suresh khade
भाजप नेते सुरेश खाडे


आमदार डॉ. सुरेश दगडू खाडे यांचा जन्म १ जून १९५८ रोजी झाला. वेल्डिंग डिप्लोमा असे त्यांचे शिक्षण झालं आहे. तसंच कोलंबो युनिव्हरसिटी येथून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. सुरेश खाडे हे २००४ साली पहिल्यांदा जत मतदारसंघामधून निवडून आले. त्यानंतर मिरज मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी विधानसभा गाठली. २०१९ मध्ये भाजपा-सेना युती सरकारमध्ये त्यांनी चार महिन्यांसाठी समाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

शिंदे-फडणवीसांना १२ कोटी लोकसंख्येतून एकही महिला मिळाली नाही?, मंत्रिमंडळ विस्तारात मोठा अन्याय

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार ते गोपीनाथ मुंडेंचा विश्वासू शिलेदार

सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. भाजपमध्ये आल्यानंतर सुरेश खाडे हे भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाऊ लागले. भाजपचा जिल्ह्यातील दलित चेहरा,अशी त्यांची ओळख आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सुरेश खाडे यांनी विधानसभेत अनेकवेळा आवाज उठवला आहे.

महत्वाचे लेख