अ‍ॅपशहर

भोवळ येऊन पडली, रक्तबंबाळ झाली, विमानात थरारक प्रसंग; सांगलीचा सुपुत्र ठरला देवदूत

विमानातून मुंबई येथून रवाना झालेल्या हर्षद शहा यांच्यासोबत विमानात एक थरारक प्रकार घडला. विमानातील प्रवास करणाऱ्या एका महिलेला चक्कर आली, ती पडली आणि गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाली.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2023, 11:20 pm
सांगली: हजार फूट उंचीवर विमानात एक महिला चक्कर येऊन पडल्याने गंभीर जखमी झाली. विमानात अचानक घडलेल्या घटनेने वैमानिकासह साऱ्या प्रवाशांची धांदल उडाली. मात्र, या विमान प्रवासात सांगलीच्या इस्लामपूरच्या सुपुत्राने धाडसाने पुढे येऊन जखमी महिलेवर तात्काळ कल्पक बुद्धीने उपचार केले आणि महिलेचे प्राण वाचवले. हा सर्व थरारक प्रकार विमानातून लंडनकडे जाताना घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sangli Dr Harshad Shah


इस्लामपूर येथील डॉक्टर पी. टी. शहा आणि डॉक्टर नलिनी शहा यांचे सुपुत्र डॉक्टर हर्षद शहा मुंबईत वैद्यकीय पदवी शिक्षण घेत होते आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हृदय विकारातील अद्यावत प्रशिक्षण घेण्यासाठी लंडन या ठिकाणी इंटरनॅशनल क्लिनिकल फिलोशीपसाठी रविवारी रवाना झाले होते. विमानातून मुंबई येथून रवाना झालेल्या हर्षद शहा यांच्यासोबत विमानात एक थरारक प्रकार घडला. विमानातील प्रवास करणाऱ्या एका महिलेला चक्कर आली, ती पडली आणि गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाली. मात्र, वेळीच हर्षद शहा यांनी धाव घेऊन या महिलेवर उपचार करत तिचा जीव वाचवले.

मुंबईतून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानातून प्रवास करणारी एक इंडो-अमेरिकन महिला अचानकपणे चक्कर येऊन पडली आणि रक्तबंबाळ झाली. हजार फूट उंचीवर विमानात सर्व प्रकार घडल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. प्रवाशांना आणि विमानातल्या वैमानिकासह कर्मचाऱ्यांना काय करावं हा प्रश्न पडला. या ठिकाणी असणाऱ्या एअरहोस्टेसने विभागात कोणी डॉक्टर असेल तर पुढे यावं, असं आवाहन केलं आणि मग क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर हर्षद शहा हे धावून पुढे आले.

बापरे! १२०० वर्षांपूर्वी चिखलात खजिना लपवला, आता सापडला; सोन्याचे दागिने अन्...
महिलेच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी झाला होता. पण, डॉक्टर हर्षद शहा यांनी याची तात्काळ तपासणी करत विमानातल्याच दोन प्रवासी महिलांना घेऊन विमानात असणाऱ्या उपलब्ध औषध साधनाच्या आधारे उपचार सुरू केला. पण, रक्तस्त्राव खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन इमर्जन्सी लॅडिंग करावी लागणार का, अशी परिस्थिती देखील निर्माण झाली. त्यामुळे वैमानिकाने आपल्या केबिनमधून बाहेर येत त्याने पुढे असणाऱ्या तेहरान हवाई अड्ड्यावर विमान उतरवायचे का? याबाबत विचारणा केली. पण विमान उतरल्यानंतर पुन्हा दीड दिवस विमान उड्डाण घेऊ शकणार नाही, याची कल्पना देखील डॉक्टर हर्षद शहा यांना दिली.

पण, हर्षद शहा यांनी आपल्याला काही वेळांचा अवधी देण्याची विनंती वैमानिकाला केली आणि शांत आणि संयमाने महिलेवर उपचार सुरू केला. बिझनेस क्लासच्याच एका बेडवर महिलेवर हा शहा यांनी गतीने उपचार सुरू केल्यावर काही वेळातच महिलेने उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे हर्षद शहा यांच्यासोबत सर्वांच्याच जीवात-जीव आला.

Super Earth: शास्त्रज्ञांना महा-पृथ्वी सापडली, पाणीच-पाणी असण्याची शक्यता, ग्रहाचं गूढ कायम
हर्षद शहा यांनी घटनेचे गांभीर्य आणि तातडीने उपचारासाठी उचललेले पाऊल आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या मदतीने विमानात मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचे प्राण वाचले आणि या सर्व गोष्टीबद्दल उपस्थित विमानातील प्रवाशांनी डॉक्टर हर्षद शहा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिलांनी राहून कृतज्ञता व्यक्त केली, तर हजार फूट उंचीवर घडलेला प्रकार विमानातल्या प्रवाशांसाठी थरारक असा प्रसंग ठरला.

महत्वाचे लेख