अ‍ॅपशहर

प्रेयसीच्या आत्महत्येच्या खोट्या कॉलने सांगलीत थरारक घटना, प्रियकराची हत्या

प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सांगलीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मिरज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका चुकीच्या फोन कॉलमुळे ही हत्येची घटना घडल्याचं बोललं जात आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2022, 12:20 pm
सांगली : प्रेम प्रकरणातून मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. प्रभू सुर्यवंशी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येच्या चुकीच्या माहितीतून रागाच्या भरात तिच्या प्रियकराची सुनील शिंदे या तरुणाने हत्या केली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम love affair case and murder in sangli
प्रेयसीच्या आत्महत्येच्या खोट्या कॉलनंतर प्रियकराची हत्या, सांगलीतील थरारक घटना


मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातले लंगरपेठ येथील प्रभू सुर्यवंशी (वय २२) हा मिरजेत सुनील शिंदे या आपल्या मित्राच्या नातेवाईकांच्या हॉटेलमध्ये कामाला होता. सुनील देखील लंगरपेठेचा असून तो देखील कामा निमित्ताने मिरजेत आपल्या बहीणेकडे राहतो. सुनील आणि प्रभू हे दोघेही खास मित्र होते. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रभू याचे तेथील सुनील याच्या नात्यातील एका तरुणीसोबत सूत जुळले होते. तीन दिवसांपूर्वी सदर प्रेम प्रकरणाची माहिती प्रभू याने सुनील याला दिली होती. त्यानंतर प्रभू, त्याची प्रेयसी, सुनील आणि इतर सर्व जण एकत्र आले होते. त्यावेळी प्रभू याने आमचे एकमेकांवर प्रेम असून दोघांचं लग्न लावून न दिल्यास आत्महत्या करणार, अशी धमकी दिली. मात्र, मुलीकडच्या सर्वांनी लग्नाला विरोध केला. यामुळे वाद निर्माण झाला होता.

या प्रकारानंतर सुनील याने मित्र प्रभू याला शांत करत गावी जाण्यास सांगितले. त्याला दुचाकीवरून लंगरपेठ येथे घेऊन जाण्यास निघाला. यावेळी त्यांच्यासोबत सुनील याचा नातेवाईक ज्ञानदेव सूर्यवंशीही सोबत होता. तिघे गावाला जात असताना गुंडेवाडी येथील खंडेराजुरी रस्त्यावर पोहचले असताना सुनीलला घरातून फोन आला. तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असं त्याला सांगण्यात आलं. या रागातून सुनील याने तरुणीच्या मृत्युला तूच कारणीभूत असल्याचे सांगत प्रभूच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. ज्यामध्ये प्रभु हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना रविवारी प्रभूचा मृत्यू झाला.

सांगलीच्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यांचा दुर्गावतार; चाकूने हल्ला करणाऱ्यांची केली धुलाई

सुनीलला फोनवरून दिलेली तरुणीच्या आत्महत्येची माहिती खोटी होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, प्रभूच्या हत्ये प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सुनील सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

डॉक्टर कुटुंब सहलीला गेले; तब्बल २५ तोळे सोने, दीड किलो चांदीवर मारला डल्ला

महत्वाचे लेख