अ‍ॅपशहर

आधीच कर्ज त्यात पत्नीच्या आजाराने नको नको केलं, अखेर सोडली सगळ्यांची साथ

Sangli News : संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघातात झाला होता आणि त्यानंतर पत्नीच्या उपचारासाठी संजय चौगुले यांनी कर्ज घेतले. मात्र, उपचार करुन देखील पत्नीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या.

| Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2022, 3:21 pm
सांगली : पत्नीच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च होऊन ते फेडणे अशक्य झाल्याने आणि पत्नी ठीक होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वशी येथे ही घटना घडली आहे. संजय चौगुले असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sangli News
कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने उचललं धक्कादायक पाऊल


संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघातात झाला होता आणि त्यानंतर पत्नीच्या उपचारासाठी संजय चौगुले यांनी कर्ज घेतले. मात्र, उपचार करुन देखील पत्नीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे चौगुले हे चिंतेत होते. एकीकडे पत्नीचा आजार ठीक होत नाही. कर्जाचा डोंगर वाढत आहे यामुळे नैराश्यातून संजय चौगुले यांनी आपल्या राहत्या घराशेजारी असणाऱ्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत घटनेची नोंद केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


दोघे नवरा बायको हे रविवारी आपल्या चोरीला गेलेल्या शेळ्या शोधण्यासाठी कोल्हापूरच्या वडगाव या ठिकाणी जनावरांच्या आठवडा बाजारात गेले होते. मात्र, त्यांना त्या ठिकाणी आपल्या शेळ्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे ते निराश होऊन घरी परतले होते आणि आज सोमवारी सकाळी संजय चौगुले यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

महत्वाचे लेख