अ‍ॅपशहर

सांगलीत ट्रक उलटून ११ मजूर ठार

सांगलीत आज सकाळी फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ मजूर जागीच ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी या दहाही मजुरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Times 21 Oct 2017, 12:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सांगली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 dies in truck accident in sangli
सांगलीत ट्रक उलटून ११ मजूर ठार


सांगलीत आज सकाळी फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ मजूर जागीच ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी या मजुरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासगाव तालुक्यातील कवठेमहाकाळ येथील योगेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. काही मजुरांना घेऊन हा ट्रक कराडच्या दिशेने चालला होता. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर फरश्या भरण्यात आलेल्या होत्या. कवठेमहाकाळ मार्गावरील योगेवाडीजवळ ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला आणि ट्रकमधील ११ मजूर जागीच ठार झाले. तर फरश्या अंगावर आदळल्याने १५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अपघातात ठार झालेले सर्व मजूर कर्नाटकचे असून मजुरीसाठी ते कराडला जात होते. एसटीचा संप असल्याने फरशी भरलेल्या ट्रकमधून त्यांना प्रवास करावा लागल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज