अ‍ॅपशहर

सातारा, सांगली, रत्नागिरीत भूकंपाचे धक्के

सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज, शुक्रवारी पहाटे ५. २० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती. कोयना परिसरापासून २१.६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Times 10 Nov 2017, 9:04 am
मटा ऑनलाइन वृत्त | सातारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 5 magnitude earthquake hits satara sangali ratnagiri in maharashtra
सातारा, सांगली, रत्नागिरीत भूकंपाचे धक्के


सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज, शुक्रवारी पहाटे ५. २० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती. कोयना परिसरापासून २१.६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला. साताऱ्यातील कराड, कडेगाव तालुका आणि रत्नागिरीतील देवरुख, संगमेश्वर, चिपळूण परिसरातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सांगलीतील अनेक भागांत भूकंपाचे सर्वाधिक हादरे बसले. कोयना परिसरापासून २१.६ किलोमीटरवरील वारणा खोऱ्यातील जावळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक नागरिक भीतीने घराबाहेर पडले होते. यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज