अ‍ॅपशहर

आत्याच्या मुलाशी लग्न, वारंवार शरीरसंबंध, अल्पवयीन मुलगी गरोदर अन् सारं सत्य उघड

Satara News: अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देणं तिच्या घरच्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जेव्हा ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली त्यानंतर हा सारा प्रकरार उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2023, 7:12 am
सातारा: वय कमी असतानाही नातेवाईकांनी आत्याच्या मुलासोबतच एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने या अल्पवयीनसोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे ती अल्पवयीन पीडिता गर्भवती झाली. या कारणावरून पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध पोक्सो, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. वाई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम minor marriage.


पोलिसांनी सांगितले की, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १५ वर्ष ९ महिन्यांची अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन वाई पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सुजाता मोकाशी यांनी त्या अल्पवयीन पीडितेच्या पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विवाहिता ही अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याच आत्याच्या मुलासोबतच तिचं लग्न लावून दिलं. बालविवाह झाल्यानंतर या पतीने तिच्याशी वारंवार शारिरीक संबंधही ठेवले. त्यामुळे ती बालविवाहिता गर्भवती झाली. या कारणावरून चौघांविरुद्ध पोक्सो, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार तपास करत आहेत.

कायदा काय सांगतो?

जास्त वयाच्या पुरुषाने १८ पेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केले, तर त्याला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वर आणि वधू यांचे विवाह लावण्यास प्रत्यक्षात मदत केली, जे अशा विवाहात सामील झाले होते, त्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, संबंधित स्त्री गुन्हेगारांला कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या मुलीचे लग्न झाल्यास पोक्सो - २०१२ कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.

महत्वाचे लेख