अ‍ॅपशहर

दमदार पावसाने टँकरच्या संख्येत घट

जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात काही ठिकाणी दमदार स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे. एक जूनच्या तुलनेत ७६ टँकर कमी करण्यात आले आहेत.

Maharashtra Times 29 Jun 2016, 11:40 pm
सातारा : जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात काही ठिकाणी दमदार स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे. एक जूनच्या तुलनेत ७६ टँकर कमी करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात ८४ टँकरद्वारे ११९ गावे आणि २८४ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात अाहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम decrease in water tankers
दमदार पावसाने टँकरच्या संख्येत घट

जिल्ह्यात एक जूनला १६० टँकरद्वारे २०५ गावे आणि ७७७ वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर बहुतांशी दुष्काळी तालुक्यात काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने टँकरची मागणी कमी झाली. सध्या माण तालुक्यात सर्वाधिक १६, खटाव तालुक्यात आठ, कोरेगाव तालुक्यात १६, खंडाळा तालुक्यात ३, फलटण तालुक्यात १२, वाई तालुक्यात सहा, पाटण तालुक्यात पाच, जावली तालुक्यात 12, महाबळेश्वर तालुक्यात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यात १, कराड तालुक्यात दोन टँकर सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज