अ‍ॅपशहर

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात युरिया टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उच्च दाब वाहिनीच्या तार पडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुढे (ता. पाटण) येथे घडली. तात्यासो जगन्नाथ कदम (वय ४२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. गुढे येथे घडलेली ही दुसरी घटना आहे.

महाराष्ट्र टाइम्स 2 Sep 2019, 4:00 am
कराड : शेतात युरिया टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उच्च दाब वाहिनीच्या तार पडून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुढे (ता. पाटण) येथे घडली. तात्यासो जगन्नाथ कदम (वय ४२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. गुढे येथे घडलेली ही दुसरी घटना आहे. तात्यासो कदम कराड धेबेवाडी रस्त्यावरील आपल्या शेतात पिकाला युरिया टाकण्यासाठी गेले होते. पिकाला युरिया टाकताना अचानक अर्थिंगची तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. विजेचा जोरदार झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तात्यासो कदम यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. दरम्यान, गुरुवार रात्री गुढे येथे विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dead

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज