अ‍ॅपशहर

उदयनराजेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?, शिवेंद्रराजेंनी टोला लगावत दिलं उत्तर

वाढदिवसानिमित्त आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2022, 3:41 pm
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली. दोन्ही राजे दंड थोपटून एकमेकांसमोर उभे असलेले पहायला मिळाले. आताही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम udayanraje bhosale and shivendra raje bhosale
udayanraje bhosale and shivendra raje bhosale


खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमावर शिवेंद्रराजेंनी जोरदार आरोप केले होते. उदयनराजेंची झालेली एण्ट्री यावर तर शिवेंद्रराजेंनी चांगलाच समाचार घेतला होता. असं असलं तरी या आधी वाढदिवसाला दोन्ही बंधू एकमेकांना कायम शुभेच्छा देताना पहायला मिळालेत. मात्र, यावेळी चाललेल्या राजकीय गरमागरमीमुळे दोन्ही राजे शुभेच्छा देण्यापासून अलिप्त राहिले.

पुण्यात परदेशातील मित्राची ४५ लाखांची फसवणूक
उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर मला कोणीच फोन केला नाही. मला शुभेच्छा दिल्या नाहीत, असं उत्तर शिवेंद्रराजेंनी दिलं. दोन्ही राजेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने भावांमधील नात्यातली दरी वाढल्याचं पहायला मिळालं. उदयनराजेंनी 'चला हवा येवू द्या', 'बैलगाडी शर्यत', 'रिक्षा स्पर्धा' असे अनेक कार्यक्रम घेतले होते. या सर्व कार्यक्रमांना लाखो लोकांची उपस्थिती होती. परंतु, उदयनराजेंच्या या कार्यक्रमांवर आमदार शिवेंद्रराजेंनी टिका केली होती.

उदयनराजेंच्या हवेतून झालेल्या एण्ट्रीवर टीका करत ज्यांची कामच हवेत असतात ते हवेतच राहणार असं वक्तव्य केल‌ं होतं. यावरुन दोन्ही राजेंमध्ये चांगलच घमासान रंगलं. उदयनराजेंच्या झालेल्या जंगी वाढदिवसानंतर शिवेंद्रराजे कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणार याबाबत साताऱ्यात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात करोनाचे निर्बंध हटणार पण..., आरोग्यमंत्र्यांची माहिती
आमदार शिवेंद्रराजे हॅलिकॉप्टरमधूनच एण्ट्री करणार अशा चर्चांना चांगलच उधान आलं होतं. मात्र, शिवेंद्रराजेंनी वाढदिवस साधेपाणाने साजरा करत सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. परंतु, उदयनराजेंचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आलाच नाही असंही शिवेंद्रराजेंनी सांगितलं.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज