अ‍ॅपशहर

तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबितआरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

सातारा जिल्हा कारागृहात मोक्काअंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे मोबाइल सापडला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी अवघडे यांची तडकाफडकी बदली तर सुभेदार कल्पना खरात यांना कारागृह महानिरीक्षकांनी निलंबित केले आहे.

Maharashtra Times 14 Mar 2017, 10:37 pm
तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satara police
तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबितआरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

आरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा कारागृहात मोक्काअंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे मोबाइल सापडला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी अवघडे यांची तडकाफडकी बदली तर सुभेदार कल्पना खरात यांना कारागृह महानिरीक्षकांनी निलंबित केले आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी कारागृहात च मोबाइल सापडला होता आणि कारागृहाच्या दक्षता पथकाच्या झडतीत मोबाइल वापराचे हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाचा अहवाल कारागृह अधीक्षक एन. एन. चोंदे यांनी कारागृह महानिरीक्षकांना पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन सुभेदार कल्पना खरात यांना तातडीने निलंबित करण्यात आले. वरीष्ठ तुरूंग अधिकारी अवघडे यांची खुले कारागृह आटपाडी येथे तातडीने बदली करण्यात आली. या बदलीला प्रतिनियुक्तीचे गोंडस कारण देण्यात आले. कारागृह अधीक्षकांच्या आशिर्वादानेच घायवळला पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची बातमी आहे मात्र, कारवाईचे झेंगट अवघडे व खरात यांच्या गळ्यात पडले. दक्षता समितीने कारागृहातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यामध्ये १७ फेब्रुवारी रोजी खरात घायवळ यांच्याशी बोलताना आढळून आल्या. या अनुषंगाने चौकशी करून त्यांच्यार दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज