अ‍ॅपशहर

सयाजी शिंदे यांनी लावलेल्या झाडांची नासधूस

सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका दुष्काळी गावात लावलेली झाडं अज्ञात लोकांनी तोडल्याचं समोर आलं आहे. काल हा प्रकार घडला असून ही झाडं नेमकी कुणी तोडली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेलं नाही.

Maharashtra Times 17 Jan 2017, 5:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सातारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम some unidentified people cut a roadside tree in satara
सयाजी शिंदे यांनी लावलेल्या झाडांची नासधूस

सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका दुष्काळी गावात लावलेली झाडं अज्ञात लोकांनी तोडल्याचं समोर आलं आहे. काल हा प्रकार घडला असून ही झाडं नेमकी कुणी तोडली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेलं नाही.

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील पांढरवाडी इथं सयाजी शिंदे यांनी अनेक झाडांची लागवड केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून या झाडांना नित्यनेमानं पाणी घातलं जात होतं. परिसरातील शाळकरी विद्यार्थी झाडांची काळजी घ्यायचे. सयाजी शिंदे स्वत: झाडांच्या देखभालीवर लक्ष ठेवून असायचे. विशेष म्हणजे, या झाडांना पाणी घालूनच सयाजी शिंदे यांनी २०१७ या वर्षाचं स्वागत केलं होतं. मात्र, काल अचानक कुणी तरी अज्ञातांनी या झाडांची नासधूस करून टाकली. पांढरवाडी गावाकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जवळपास शंभरहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. या प्रकारामुळं ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज