अ‍ॅपशहर

‘तारळी’ ओव्हरफ्लो

पाटण तालुक्यातील तारळी विभागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. तारळी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे.

Maharashtra Times 29 Aug 2017, 11:59 pm
कराड : पाटण तालुक्यातील तारळी विभागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. तारळी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. ५.८५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे तारळी धरण मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी ४.३० वाजता धरणाचे तीनही दरवाजे ०.२५ने उचलून तारळी नदीपात्रात २ हजार १८० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तारळी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारळी परिसरात आजपर्यंत एकूण १२७० मिलीमीटर पाऊस पडला आहे. सध्या धरणात २९४३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज