अ‍ॅपशहर

Sindhudurg News : कोकणात किनारपट्टी भागात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, सर्व हॉटेल्स-लॉजची तपासणी सुरू

Sindhudurg Today News Live : दिघी भरतखोल इथे लाईफ तराफा मिळाल्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 8:46 am
सिंधुदुर्ग : हरेश्वर श्रीवर्धन इथे समुद्रकिनारी सापडलेल्या बोटीच्या तसेच दिघी भरतखोल इथे लाईफ तराफा मिळाल्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. वेंगुर्ले हद्दीतील लँडिंग पॉईंट आणि कोस्टल पॉईंट इथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सागररक्षक दल सदस्यदेखील सतर्क करण्यात आले आहेत. संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत वेंगुर्ले पोलिसांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhudurg live batmya


किनारपट्टीवर बोटिंगची व गाड्यांची कसून तपासणी

हरेश्वर श्रीवर्धन इथे समुद्रकिनारी मिळून आलेल्या बोटीच्या अनुषंगाने, तसेच दिघी भरतखोल इथे लाईफ तराफा मिळाल्याच्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल लॉजेस चेक करण्यात आलेली आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

तरुण पोरांनाही मागे टाकलं, वेळेच्या तीन तास आधीच शर्यत संपवली, बारामतीचे आजोबा ठरले 'IRON Man'

वेंगुर्ला हद्दीतील लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सगररक्षक दल सदस्य आणि वारडन यांनादेखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

दरम्यान, आम्ही स्वतः समुद्रातून येणाऱ्या बोटी बंदरावर चेक करीत आहोत. तसेच बोटीवर कामास असलेले खलाशी व बाहेरील राज्यातील इसम यांची चौकशी करीत आहोत, अशी माहिती जाधव यांनी दिली.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख