अ‍ॅपशहर

...तर हे माझा जीव घेतील, सुशांतचा आईला फोन ठरला अखेरचा, मृत्यूचं गूढ उलगडण्याच्या मार्गावर

crime news : सुशांत खिल्लारे याने २९ जानेवारीला रात्री आपल्या आईशी शेवटचा संपर्क केला होता. पैसे दिले नाहीत, तर हे लोक आपला जीव घेतील, असे त्याने सांगितले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2023, 4:19 pm
सिंधुदुर्ग : कराड येथे सुशांत आप्पासो खिल्लारे (वय २६ वर्ष, रा. पंढरपूर) याचा खून केल्याप्रकरणी ताब्यात असलेला तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात खुनासह अपहरण, पुरावा नष्ट करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पैसे नाही दिले तर हे लोक आपला जीव घेतील, असे खिल्लारे याने मृत्यूपूर्वी आपल्या आईला फोन करून सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sindhudurg Sushant Khillare Murder
सुशांत खिल्लारे हत्या प्रकरण


या प्रकरणाचा पुढील तपास उपविभाय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी आंबोली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तर शवविच्छेदन अहवालानंतर खिल्लारेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आलेल्या खिल्लारे याचे नातेवाईक गुरुवारी दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अपहरण करणे, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत मेंगडे म्हणाले की, या प्रकरणात खिल्लारेचे नातेवाईक आले. परंतु त्यांनी आपला आणखी कोणावर संशय नाही, तसेच अन्य कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

आईला केला होता फोन

खिल्लारे याने २९ जानेवारीला रात्री आपल्या आईशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यात आपण पैसे दिले नाहीत, तर हे आपला जीव घेतील, असे सांगितले होते. खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडी पोलिसात दाखल झाले आणि त्यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा : फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नकार दिला पण पुढे जे घडलं ते ऐकून व्हाल सुन्न..!

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी

सुशांत खिल्लारे हत्या प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलिसच करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, हा तपास कऱ्हाड पोलिसांकडे वर्ग केला जाईल, असे सांगण्यात येत होते; पण आता हा तपास सावंतवाडीतूनच होणार, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आंबोली येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा : मॉलमध्ये खरेदी करुन परतताना घात, एक चूक आणि बाईकस्वार जीवलग मित्रांचा जीव गेला

महत्वाचे लेख