अ‍ॅपशहर

नारायण राणेंचा सभागृहात गदारोळ, नितेश राणे आणि शिवसेनेच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची

राणेंनी पेपरमध्ये आलेली बातमीचा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Maharashtra Times 16 Nov 2021, 2:28 pm
सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजनचे अध्यक्ष उदय सामंत नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सभागृहात गदारोळ केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhudurga


जिल्हा नियोजन समितीची सभा ओरोस येथे सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला.

पिंपरीत ३ वाहनांचा विचित्र अपघात; रस्त्याने विरुद्ध दिशेने नेली बुलेट अन्..., एक जागीच ठार
यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. राणेंनी पेपरमध्ये आलेली बातमीचा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं. मात्र, नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभेस शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. पेपरमधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याच काम केलं.

महत्वाचे लेख