अ‍ॅपशहर

कोल्होबामुळे चिपी विमानतळावर लँडिंग रखडलं, १० मिनिटं आकाशातच घातल्या गिरट्या, अखेर....

कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर १० मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, लँडिंग रखडल्याने भीतीही वाटत होती.

Maharashtra Times 18 Oct 2021, 12:19 pm
रत्नागिरी : कोकणात सिंधूदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळावर मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर चक्क कोल्होबा आल्याने विमानाचे लँडिंग वेळेत होऊ शकले नाही. विमानाला तब्बल दहा मिनिटे आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या. हा प्रकार पायलटच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात नेले आणि संबंधित यंत्रणेला कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhudurg chipi airport chipi maharashtra
कोल्होबामुळे चिपी विमानतळावर लँडिंग रखडलं, १० मिनिटं आकाशातच घातल्या गिरट्या, अखेर....


कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर १० मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, लँडिंग रखडल्याने भीतीही वाटत होती. वैमानिक व प्रशासन यांच्या सतर्कतेमुळे लँडिंग सुरक्षित होऊ शकले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचे टोळके आहे. हे कोल्हे भक्ष्यासाठी फिरत असतात.

विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्यामूळे हा धक्कादायक प्रकार घडल्याच समोर आले आहे. मात्र यावर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जाणे आवश्यक आहे. प्रवासी सुरक्षा हा मुद्दा महत्वाचा असून यावर आता प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार हे लवकरच पहायला मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज