सिंधुदुर्ग: वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर-सातवायंगणी येथे दुर्दैवी घटना घडली. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले असून, तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला तालुक्यातील सातवायंगणी येथे मातोंड पेंडुर सातवायंगणी ते घोडेमुखकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी आज, शनिवारी काम करीत असलेल्या दोन कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दोघेही कामगार दबले गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ रामू राठोड (वय ५२, रा. कोळयाल तांडा, ता. हुनसगी, जिल्हा- यादगीर, कर्नाटक) आणि ओमप्रकाश तेजूनायक राठोड (वय ३२, रा. शेवालाल कॉलनी, येलगी तांडा, ता-हुनसगी जिल्हा-यादगीर, कर्नाटक) अशी दोघांची नावे आहेत. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Sindhudurg: दुर्दैवी घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून २ कामगारांचा मृत्यू
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. पेंडुर-रातवायंगणी येथे पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन कामगारांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.
हायलाइट्स:
- मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू
- सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील धक्कादायक घटना
- वेंगुर्ला पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू