अ‍ॅपशहर

पंढरपुरात भीषण अपघात: ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला; ३ महिलांसह २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

Pandharpur News Today : ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट उजनी कालव्यात कोसळला. रात्री उशिरा झालेल्या या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2022, 10:22 am
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसरात ऊसतोड कामगारांना‌ घेऊन‌ जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pandharpur tractor accident
पंढरपूर ट्रॅक्टर अपघात


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एक ट्रॅक्टर मंगळवारी ऊसतोड मजुरांना उसाच्या फडात घेऊनजात होता. मात्र रात्री ११ वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तसंच काही जण जखमीही झाले आहेत.

मोठी बातमी : जळगावातील सराफा बाजारात सीबीआयचे पथक धडकले, छापेमारीचं कारण उघड

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तसंच याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज