अ‍ॅपशहर

राणे स्वत:च निर्णय जाहीर करतील: चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला. या भेटीवर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही थेट भाष्य करणे टाळलं आहे. नारायण राणे यांचा निर्णय तेच जाहीर करतील, सध्या तरी ते काँग्रेसवासी आहेत, अशी सारवासारव करत चव्हाण यांनी हात झटकले आहेत.

Maharashtra Times 27 Aug 2017, 3:28 pm
सुनील दिवाण । पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashok chavan on narayan rane
राणे स्वत:च निर्णय जाहीर करतील: चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला. या भेटीवर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही थेट भाष्य करणे टाळलं आहे. नारायण राणे यांचा निर्णय तेच जाहीर करतील, सध्या तरी ते काँग्रेसवासी आहेत, अशी सारवासारव करत चव्हाण यांनी हात झटकले आहेत.

अशोक चव्हाण आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे प्रभारी मोहन प्रसाद, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार भारत भालके आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांच्यावर राणेंसंदर्भात प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तेंव्हा चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये सगळेच आलबेल असल्याचं भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र राणेंचा निर्णय तेच जाहीर करतील असं सांगायला ते विसरले नाहीत.

ही तर सरकारची दिवाळखोरी

शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फडणवीस सरकारने केलेली फसवी घोषणा असल्याची टीका करतानाच या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफीसाठी शक्ती मिल विक्रीला काढण्याची भाषा करणे म्हणजे सरकारचे आर्थिक नियोजन फसले असल्याचे स्पष्ट होते. खरे तर शक्ती मिल विकणे ही सरकारची बौद्धिक दिवाळखोरीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही राज्यात विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावत आहोत. ही भूमिका बजावताना राष्ट्रवादीने साथ दिली नाही तरी आम्हीही राष्ट्रवादीवर अवलंबून नाही, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज