अ‍ॅपशहर

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का: १८ वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर; भगीरथ भालकेंच्या पॅनलचा धुव्वा

Pandharpur Sugar Factory Election : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचं चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या नंबरवर फेकले गेले आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2022, 1:47 pm
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू असलेली मतमोजणी संपली असून नवख्या अभिजीत पाटील यांनी सत्ताधारी भगीरथ भालके यांचा पराभव करीत १८ वर्षानंतर सत्तांतर घडवलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhalke
भगीरथ भालके


अभिजित पाटील यांनी या विजयासह पाचवा कारखाना ताब्यात घेतला आहे. हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा हादरा मानला जात आहे. या कारखान्याची सत्ता ताब्यात असलेल्या व्यक्तीचं तालुक्याच्या राजकारणातही वर्चस्व राहते, असं मानलं जातं. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचं चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या नंबरवर फेकले गेल्याने भालके यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे.

Uddhav Thackeray: 'एका अटीवरच आम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर जाऊ'; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

या निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच युवराज पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले होते. मात्र त्यांचे पॅनल दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अतिशय तरुण नेता म्हणून अभिजित पाटील यांना पसंती देताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या इतर चार साखर कारखान्यांमुळे विठ्ठलाच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पाटील यांनी २० वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन केवळ ३५ दिवसात तो सुरू केला होता. यामुळेच गेल्या २ वर्षांपासून बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी अभिजीत पाटील याना पसंती दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, या पराभवाचा फटका राष्ट्रवादी आणि भगीरथ भालके यांना बसणार असला तरी मतमोजणी प्रक्रियेवर दुसरे पॅनल प्रमुख युवराज पाटील यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज