सांगली : कवठेमहांकाळ येथे मुकुंद उर्फ सोनू दुधाळ याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तुल, एक जीवंत काडतुस, दोन हेल्मेट आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. दिनेश बाळासो माने (वय २२) आणि दत्तात्रय उर्फ बंडू मनोहर भुसनर (वय २३, दोघेही रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दोघे गजाआड
कवठेमहांकाळ येथे मुकुंद उर्फ सोनू दुधाळ याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ...
Maharashtra Times 27 Jul 2018, 4:00 am