अ‍ॅपशहर

शिंदेंना वगळल्याने काँग्रेसची निदर्शने

म टा...

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. मात्र, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापुरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निर्दशने केली़. या वेळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच जणांना स्थान देण्यात आले असून, मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला वगळण्यात आल्याने सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' एवढीच प्रतिक्रिया दिली होती. परंतु, औपचारिक गप्पांमध्ये मात्र त्यांनी 'पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. आता काहीही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांची टीम खूप चांगली असून, आगामी काळात या टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत,' असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज