अ‍ॅपशहर

काँग्रेसने टॉयलेटला दिले ऋषी कपूर यांचे नाव!

देशातील अनेक ठिकाणं आणि राष्ट्रीय मालमत्तांना आधीच्या काँग्रेस सरकारांकडून गांधी, नेहरू यांची नावे देण्यात आल्याचे नमूद करत त्याला जोरदार आक्षेप घेणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या काँग्रेसच्या निशाण्यावर असून सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क एका सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचे नाव देऊन आपला निषेध नोंदवला आहे.

Maharashtra Times 23 May 2016, 9:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress workers named rishi kapoor to public toilet in solapur
काँग्रेसने टॉयलेटला दिले ऋषी कपूर यांचे नाव!

देशातील अनेक ठिकाणं आणि राष्ट्रीय मालमत्तांना आधीच्या काँग्रेस सरकारांकडून गांधी, नेहरू यांची नावे देण्यात आल्याचे नमूद करत त्याला जोरदार आक्षेप घेणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या काँग्रेसच्या निशाण्यावर असून सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क एका सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचे नाव देऊन आपला निषेध नोंदवला आहे.

'सगळीकडे गांधी-नेहरूंची नावे द्यायला बापाचा माल समजलात का?', असा सवाल ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. या ट्विटमुळे मोठं वादळ उठलं होतं. ऋषी कपूर यांच्या म्हणण्याचं अनेकांनी समर्थन केलं तसा त्याला तीव्र विरोधही झाला. काँग्रेसने कपूर यांच्यावर पलटवार करताना कुठल्या वास्तूला कोणतं नाव असावं वा असू नये हे सांगणारे ऋषी कपूर कोण?, असा सवाल केला होता. ऋषी कपूर यांच्यासारखे काही लोक भाजप सरकारच्या 'गुड बुक'मध्ये स्थान मिळवण्यासाठीच हा सगळा खटाटोप करत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं योगदान फार मोठं आहे. देशासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावास कुणाचाही आक्षेप असण्यांचं कारण नाही, असे काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी सुनावले होते. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शनही केली होती. ऋषी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांनी हिंसक आदोनल केले. अशीच निदर्शने आज सोलापुरात करुन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क शहरातील एका सार्वजनिक शौचालयाचं थेट 'ऋषी कपूर सार्वजनिक शौचालय' असं नामकरण करुन आपला निषेध नोंदवला.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गांधी कुटुंबाबाबत अनुदार उद्गार काढल्याने निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज