अ‍ॅपशहर

हातभट्टींवर धाडी;१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरराज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा आणि वडजी तांडा या परिसरातील हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक सागर धोमकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ६ ते १० यावेळेत कारवाई करून हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्यात आले.

Maharashtra Times 27 Aug 2016, 10:35 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम desi liquor solapur
हातभट्टींवर धाडी;१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा आणि वडजी तांडा या परिसरातील हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक सागर धोमकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ६ ते १० यावेळेत कारवाई करून हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्यात आले.

विकास पवार आणि कैलास पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ६ हजार २५० लीटर दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १२ गुन्हे नोंदविण्यात आले. ४ वारस आणि ८ बेवारसांचा यात समावेश आहे. सुमारे १२ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ६२ हजार लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज