अ‍ॅपशहर

solapur news : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

डॉक्टर चैतन्य हा सर्वोपचार रुग्णालयात कोरोना वॉर्डात रुग्णांवर उपचार करत होता. सोमवारी रात्री कोरोना वॉर्डातील काम संपवून होटगी रोडवरील मुलांच्या हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला.

महाराष्ट्र टाइम्स 5 Aug 2020, 1:23 am
सोलापूर, प्रतिनिधी: सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर चैतन्य अरुण धायफुले ( वय २४, राहणार तेलंगी पाछा पेठ, सोलापूर ) याने मंगळवारी हॉस्टेलच्या रूममधील फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अध्याप समजले नाही. करोना वॉर्डातील कामाचा ताण किंवा अन्य काही प्रकरण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम solapur news : डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या


डॉक्टर चैतन्य हा सर्वोपचार रुग्णालयात कोरोना वॉर्डात रुग्णांवर उपचार करत होता. सोमवारी रात्री कोरोना वॉर्डातील काम संपवून होटगी रोडवरील मुलांच्या हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला. मंगळवारी दुपारी त्याने रूममधील पंख्याला दोरीने फास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याचा भाऊ देवल आणि सहकाऱ्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच डॉक्टर चैतन्य याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. चैतन्य हा सोलापूर शहरातील असला तरी हॉस्टेलवरच राहत होता. त्याने नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने काय लिहून वगैरे ठेवले होते काय ? याचा तपास पोलीस करत आहेत. डॉक्टर बी. बी. आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज