अ‍ॅपशहर

गर्भपाताचे रॅकेट उघड, २ डॉक्टरांवर गुन्हा

अकलूज येथे ३६ गर्भपात केल्या प्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याला अटक करून तपास सुरु असताना आज पहाटे माळशिरस परिसरातील दोन डॉक्टरांवर ९ महिलांचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 2:36 am
म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fir filed against two doctors for illegal abortions
गर्भपाताचे रॅकेट उघड, २ डॉक्टरांवर गुन्हा


अकलूज येथे ३६ गर्भपातप्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याला अटक करून तपास सुरु असतानाच गुरुवारी पहाटे माळशिरस परिसरातील इतर दोन डॉक्टरांवर नऊ महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या परिसरात सलग अशी प्रकरणे उघड होत असल्याने खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉ. विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉ. सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच दोन्ही डॉक्टर हॉस्पिटलला कुलूप ठोकून पळून गेल्याने आता पोलिसांनी शोध कार्य सुरू केले आहे.

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी, खुळेवाडी, उंबरे दहिगाव परिसरातील नऊ महिलांचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गर्भपाताची प्रकरणे ९ ऑगस्ट, २०१६ ते १३ जानेवारी, २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधीतील असून, आता पोलिसांपुढे या सर्व रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून माळशिरस तालुका हा राज्यातील अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून चर्चेत होता. मात्र अकलूज आणि आता माळशिरस येथे रॅकेट आढळले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज