अ‍ॅपशहर

VIDEO : चहाचा नाद लै वाईट; मुंगूसालाही लागलं वेड; दिवसातून २-३ वेळा येऊन घेते आस्वाद

Mongoose In Pandharpur : पंढरपूर-पुणे रोडवरील इसबावी भागात सचिन देशमाने हे चहाचा गाडा चालवतात. त्यांच्या गाड्यावरील चहाच्या चवीमुळे या ठिकाणी नागरिकांची रेलचेल असते.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2022, 1:50 pm
पंढरपूर : चहाबद्दल भारतीय लोकांचं असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. आर्थिक स्तर कोणताही असो, चहाची सवय संपूर्ण देशात सामान्य मानली जाते. मात्र आता पंढरपुरात चक्क एका मुंगूसाला चहाचा नाद लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका चहाच्या टपरीवर गेल्या काही दिवसांपासून रोज एक मुंगूस दिवसातून दोन ते तीन वेळा येते आणि चहा पिऊन जाते. या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं असून पंढरपुरात या मुंगूसाची चांगलीच चर्चा होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pandharpur mungus
पंढरपूर मुंगूस व्हिडिओ


पंढरपूर-पुणे रोडवरील इसबावी भागात सचिन देशमाने हे चहाचा गाडा चालवतात. त्यांच्या गाड्यावरील चहाच्या चवीमुळे या ठिकाणी नागरिकांची रेलचेल असते. याच सचिन यांच्या गाड्याच्या मागे एका इमारतीचे काम सुरू असून काही महिन्यापासून एक मुंगूस येथे येत असल्याने सचिन यांनी त्याच्यासाठी एका डिशमध्ये चहा ठेवला. मग काय मुंगुसानेही हा चहा पिण्यास सुरुवात केली. बघता-बघता या मुंगूसाला चहाचं व्यसनच लागलं.

म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय? रुपाली पाटलांची सणसणीत फेसबुक पोस्ट

मुंगूसाला चहाची सवय जडली आणि दिवसातून दोन ते तीन वेळा हे मुंगूस त्याला चहाची तलफ झाली कि पात्राला धडक मारते. यानंतर त्याचा इशारा समजून सचिन या मुंगूसाला एका डिशमध्ये चहा ओतून ठेवतो. त्यानंतर हे मुंगूस पत्र्याच्या खालून बाहेर येते आणि चहा फस्त करून टाकते. कधी जर सचिन याने चहाची डिश थोडी अलीकडे लोकांमध्ये ठेवली तर हे मुंगूस हळूहळू पायाने डिश मागे ओढत नेते आणि मग निवांत चहा पिऊन निघून जाते.



पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा: आंदोलनातील VIDEO व्हायरल; मात्र पोलिसांचा वेगळाच दावा

दरम्यान, सचिनच्या गाड्यावर रोज येणारे ग्राहक ज्या पद्धतीने न चुकता चहा प्यायला येतात तसंच हे मुंगूसही येथे येऊन चहा पिण्यासाठी येते. आता या मुंगूसाची चर्चा शहरात पसरल्याने उत्सुकतेने अनेक मंडळी या मुंगूसाच्या येण्याची वाट पाहत बसलेले असतात.

महत्वाचे लेख