अ‍ॅपशहर

सोलापूर: महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; १ ठार, १५ जखमी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं काम संपलं असून ढिगाऱ्याखालून २३ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2019, 4:27 pm
करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं काम संपलं असून ढिगाऱ्याखालून २३ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम more than ten injured as concrete slab falls at maharashtra bank in karmala solapur
सोलापूर: महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; १ ठार, १५ जखमी


तालुक्याचं ठिकाण असलेल्या करमाळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक तीन मजली खासगी इमारत आहे. याच इमारतीत बँकेनं तळमजला भाड्यानं घेतला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास बँक सुरू झाल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉस्पिटलचे छत बँकेवर कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत बँकेत असलेले ग्राहक, कर्मचाऱ्यांसोबत दुसऱ्या मजल्यावर दवाखान्यात आलेले पेशंट देखील खाली कोसळून ढिगाऱ्याखाली अडकले. यात बँकेतील एक क्लार्क प्रशांत बागल यांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी आठ जणांना उपचारासाठी सोलापूरला तर, एका मुलगा व महिलेला अकलूजला हलवण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज