अ‍ॅपशहर

'सैराट'नं लायकी काढूनही मराठे शांत का?!

'मराठा समाजाची इज्जत काढणारा 'सैराट' हा चित्रपट ८० कोटी कमावतो. त्यातल्या कलाकारांचे सत्कार होतात. तरीही मराठे शांत का,' असा सवाल करत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी काल मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Times 28 May 2016, 12:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitesh rane on sairat
'सैराट'नं लायकी काढूनही मराठे शांत का?!


'मराठा समाजाची इज्जत काढणारा 'सैराट' हा चित्रपट ८० कोटी कमावतो. त्यातल्या कलाकारांचे सत्कार होतात. तरीही मराठे शांत का,' असा सवाल करत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी काल मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोलापूर येथे आयोजित एल्गार मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. मराठ्यांच्या दुरावस्थेविषयी बोलताना राणे यांनी यावेळी 'सैराट' चित्रपटाचा दाखला दिला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभरात गाजतो आहे. 'ऑनर किलिंग'चा विषय असलेल्या या चित्रपटात मराठा समाजातील मुलगी परजातीतल्या एका गरीब मुलासोबत पळून जाते आणि लग्न करते,' असं दाखवण्यात आलं आहे. त्याचा संदर्भ देत नितेश राणे यांनी मराठ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात मराठा समाजाची लायकी काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. इतर कोणत्याही समाजाचं चित्रण असं केलं गेलं असता तर तो समाज शांत बसला असता का?, चित्रपट काढणाऱ्यांना त्यांनी महाराष्ट्रात फिरू दिलं असतं का?, असा सवाल करताना त्यांनी 'बाजीराव-मस्तानी'चा दाखला दिला. 'बाजीराव-मस्तानी'मध्ये प्रियांका चोप्रा नाचताना दाखवलेली बघून ब्राह्मण समाज लगेच उभा राहिला. ब्राह्मण स्त्रीला नाचताना कसं दाखवलं, असं विचारू लागला. मग 'सैराट' बघून मराठा शांत का? याचा विचार करा, असंही राणे म्हणाले.

मराठा आरक्षणाला ठाकरे घराण्याचा विरोध

नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे घराण्यालाही लक्ष्य केले. मराठा आरक्षणाला ठाकरे घराण्याचा विरोध आहे. परंतु त्यांना अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत,' असंही नितेश म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज