अ‍ॅपशहर

घोळ! पंढरपूर मंदिर समितीचा साड्यांचा सेल

भाविकांनी रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्यांचा सेल सध्या मंदिर समितीने लावला आहे. मातेचा प्रसाद म्हणून या साड्या घेण्यासाठी महिलावर्गाने मोठी गर्दी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2018, 7:17 pm
पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pandharpur vitthal rukmini mandir samiti sells sari
घोळ! पंढरपूर मंदिर समितीचा साड्यांचा सेल


भाविकांनी रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्यांचा सेल सध्या मंदिर समितीने लावला आहे. मातेचा प्रसाद म्हणून या साड्या घेण्यासाठी महिलावर्गाने मोठी गर्दी केली आहे. पण या साड्या निराधार महिलांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. याचा विसर मंदिर समितीला पडला आहे.

रुक्मिणीमातेला रोज नऊवारी, सहावारी अशा चांगल्या प्रतीच्या साड्या नेसवल्या जातात. यासाठी रुक्मिणीमातेला रोज शेकडो साड्या महिला भाविकांकडून अर्पण करण्यात येतात. यात सहावारी आणि नऊ वारी साड्या असतात. भाविकांनी अपर्ण केलेल्या हजारो साड्या मंदिरात साठल्या होत्या. यामुळे या साड्या निराधार आणि वृद्धाश्रमातील महिलांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने बैठकीत केला होता. या निर्णयाची माध्यमातून मोठी चर्चा झाली होती. मात्र, या बातम्या विसरायच्या आत मंदिर समितीने साड्या कोणत्याही निराधार महिला अथवा वृद्धाश्रमाला न देता त्याचा थेट सेल लावला आहे. यामुळे समितीला आपल्याच निर्णयाचा विसर पडलाय का? अशी चर्चा आता भाविक करू लागले आहेत. सध्या मंदिर समितीच्या तुकाराम भवन येथे हा सेल लावण्यात आला आहे. यात विविध किंमतीच्या साड्यांचे वर्गीकरण करून विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज