अ‍ॅपशहर

दुर्मिळ जातीच्या रानमांजराची पिल्ले आढळली

माळशिरसजवळ ऊस तोड सुरू असताना बिबट्यासारखी दिसणारी दोन पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यानंतर तातडीने वन विभागाला बोलावल्यावर ही दुर्मिळ रान मांजराची पिल्ले असल्याचं समोर आलं.

महाराष्ट्र टाइम्स 29 Oct 2018, 11:43 am
पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rare species cat cubs found in pandharpur
दुर्मिळ जातीच्या रानमांजराची पिल्ले आढळली

माळशिरसजवळ ऊस तोड सुरू असताना बिबट्यासारखी दिसणारी दोन पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यानंतर तातडीने वन विभागाला बोलावल्यावर ही दुर्मिळ रान मांजराची पिल्ले असल्याचं समोर आलं.

बिबट्याप्रमाणे अंगावर ठिपके, टोकदार नखे असलेले एक पिल्लु आढळल्यावर वन विभागाने अधिक शोध घेतला. तर आणखी एख पिल्लु ऊसात सापडले. या पिल्लांची तपासणी करुन त्यांना शेतातच सुरक्षित ठिकाणी ठेऊन त्यांच्या आईची प्रतिक्षा करण्यात आली. या पिल्लांच्या आईने आज पहाटे पिल्लं ताब्यात घेतली आणि जंगलाकडे निघून गेली. 'डार्क स्पॉटेड कॅट' अशा प्रजातीमधील रान मांजराची ही पिल्ले आहेत. दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या वन क्षेत्रात ते आढळून येत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज