अ‍ॅपशहर

आर्ची निघाली दहावीच्या परीक्षेला

सैराट चित्रपटामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिची मंगळवारपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाली. अकलूजच्या शाळेत तिचा परीक्षा क्रमांक आल्याने मुख्याध्यापिका मंजुषा जैन आणि शिक्षकांनी तिचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

Maharashtra Times 8 Mar 2017, 11:10 am
पंढरपूर : सैराट चित्रपटामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिची मंगळवारपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाली. अकलूजच्या शाळेत तिचा परीक्षा क्रमांक आल्याने मुख्याध्यापिका मंजुषा जैन आणि शिक्षकांनी तिचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sairat star rinku rajguru appears for class 10th exam
आर्ची निघाली दहावीच्या परीक्षेला


सैराट चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तिचे शिक्षण थोडेसे बाजूला पडले होते. शूटिंगच्या कालावधीतही घरी अभ्यास करून तिने नववीला ९० टक्के गुण मिळवीत आपली अभ्यासातील गुणवत्ता सिद्ध केली होती. मात्र, सैराटनंतर तिला तिच्या शाळेलाही जाणे चाहत्यांमुळे अवघड बनू लागल्यावर तिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेतून आपले नाव काढून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यासाठी १७ नंबर फॉर्म भरला होता. सैराटाच्या कानडी रिमेकमध्येही ती काम करीत असल्यामुळे दहावीच्या महत्वाच्या वर्षातील ८ ते ९ महिने शूटिंगमध्ये गेले होते. त्यानंतर आर्चीने गेल्या दीड महिन्यात तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून दहावीच्या परीक्षेची तयारी केली आहे.

वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला. परीक्षेच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटता आले, याचा आनंदही घेत आहे.

- आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज