अ‍ॅपशहर

​ तुकोबाराय सराटी मुक्कामी

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर नगरीतील आपला बारावा मुक्काम आटोपून बुधवारी बावडा मार्गे पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सराटी येथे विसावला.

Maharashtra Times 28 Jun 2017, 10:55 pm
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sant tukaram maharaj palkh
​ तुकोबाराय सराटी मुक्कामी

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर नगरीतील आपला बारावा मुक्काम आटोपून बुधवारी बावडा मार्गे पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सराटी येथे विसावला.
बुधवारी पहाटे पाच वाजता इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्यासह इंदापूरवासीयांनी व सोहळा प्रमुखांनी काकडा आरती झाल्यानंतर पालखी सकाळी सहा वाजता शहरातून हरिनामाचा गजर करीत विठूरायाच्या ओढीने निघाली. पालखी सोहळ्यात खासदार छत्रपती सभांजी महाराज व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले.
शहरातून पालखी सोहळा मुख्य बाजारपेठ, खडकपुरा, नेहरु चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगरमधून ज्योतीबा मंदिरापासून ज्योतिबाच्या माळावरुन पुढे मुख्य रस्त्याला लागून विठ्ठलवाडीकडे निघाला. या वेळी इंदापूर वासीयानी दर्शनासाठी गर्दी केली होती. विठ्ठलवाडी गलांडवाडी नंबर दोनच्या ग्रामस्थांनी सोहळा गावाच्या वेशीवर येताच स्वागत केले. सकाळची न्याहारी येथेच झाली गावातील अनेकांनी अल्पोपहार दिला. पुढे वडापुरी गावात पालखी तासभर विसावली. सुरवड वकिलवस्ती येथून बावडा गावात दुपारचे भोजन आणि नंतर तालुक्यातील शेवटचे गाव सराटीत मुक्कामी विसावली. आज गुरुवारी नीरा नदीत पादुका स्नानानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून माळशिरस तालुक्यातील अकलूज गावात मुक्कामी विसावणार आहे. अकलूज येथे पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण होणार आहे. अकलूज येथील पालखी सोहळ्याचा मुक्काम यंदापासून बदलण्यात आला असून, याला काही अकलूज ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र पूर्वीची जागा कमी पडत असल्यानेच मुक्काम बदलण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांनी घेतला आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज