अ‍ॅपशहर

सुशीलकुमार शिंदेंना जेव्हा दंड होतो

वाहन परवान्याच्या नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूरच्या उपप्रादेशिक परिहन कार्यालयात येऊन २५६० रुपयांचा दंड भरला.

Maharashtra Times 28 Jul 2017, 2:25 am
सोलापूर : वाहन परवान्याच्या नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूरच्या उपप्रादेशिक परिहन कार्यालयात येऊन २५६० रुपयांचा दंड भरला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushilkumar shinde paid fine in rto office in solapur
सुशीलकुमार शिंदेंना जेव्हा दंड होतो


शिंदे यांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता परिवहन कार्यालयात येऊन स्मार्ट कार्ड लायसन्स काढले. ११ नोव्हेंबर १९६४ मध्ये मोटरसायकल व चार चाकी वाहनाच्या काढलेल्या परवान्याच्या नूतनीकरणाची मुदत संपली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी कार्यालयात येऊन वाहन परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडली.

२०१२ पासून वाहन परवाना नूतनीकरणास विलंब झाल्याने शिंदे यांना दंड भरावा लागला. ‘कायदा व नियम सर्वांना समान आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही,’ अशी प्रतिक्रिया दंड भरल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज