सोलापूर : राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनुराधा बिराजदार ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अनुराधाचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी श्रीशैल बिरादार याचाही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैलने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली, या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सलगर (ता. मंगळवेढा) येथील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पद्धतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडील विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी विष पाजून ठार मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे.
मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला
राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनुराधा बिराजदार ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे...
Maharashtra Times 10 Dec 2018, 4:00 am