अ‍ॅपशहर

दुर्दैवी! पोहता येत नसतानाही शेततळ्यात गेले, तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

शेततळ्याकडे खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या मुलांचा दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2022, 10:59 pm
सोलापूर : नियमांना फाटा देऊन शेततळ्याला कुंपण न करणं ही बाब तीन चिमुकल्यांच्या जीवावर बेतली आहे. मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथं खेळत-खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम solapur news
solapur news


ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली असताना खबर देण्यास विलंब करण्यात आल्याने रात्री दहा वाजता मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमीरे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊजी भरत निकम हे मोलमजुरीची कामे करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील माचनूरहुन शेटफळ ता. मोहोळ येथे आले होते. सोमवारीही ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असता एकत्र खेळणारे विनायक भरत निकम वय-१२, सिद्धार्थ भरत निकम वय-१०, दोघे रा. माचणूर, तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ वय-६ हे तिघेजण नजीकच्या शेततळ्याल्या पोहायला गेले.

शाहरुख खानच्या घराजवळील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १७ गाड्या घटनास्थळी
पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर सर्वांनी शेततळ्यावर धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे शेततळे महेश तानाजी डोंगरे या शेतकऱ्याचे असून त्यांनी या शेततळ्याला नियमानुसार तारेचे कुंपन घातलेले नाही. मृत बालकांचे पालक हे भटक्या नाथपंथी डवरी समाजातील आहेत. शेततळ्याला कुंपण नसल्याची बाब उघड होऊ नये, दबाव होता, म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात होता.

शेवटी माध्यमांच्या दबावानंतर मोहोळ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख