अ‍ॅपशहर

'जनतेला सुखी, सुरक्षित ठेव रे विठ्ठला!'

'महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि सुरक्षित ठेव रे विठ्ठला', असं साकडं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपूरच्या विठूरायाला घातलं. लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची आज कार्तिकी एकादशीनिमित्त विधिवत शासकीय महापूजा करण्यात आली.

Maharashtra Times 31 Oct 2017, 7:53 am
मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vitthal pooja in pandharpur on kartiki ekadashi
'जनतेला सुखी, सुरक्षित ठेव रे विठ्ठला!'


'महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि सुरक्षित ठेव रे विठ्ठला', असं साकडं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपूरच्या विठूरायाला घातलं. लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची आज कार्तिकी एकादशीनिमित्त विधिवत शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी चंद्रकांतदादांनी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी विठूमाऊलीला गाऱ्हाणं घातलं.

एसटीचे वाहक बळीराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सीनाबाई या विजापूरच्या दाम्पत्याला विठ्ठलपूजेचा मान मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर भाविकांचा महासागर लोटला आहे. तब्बल ६ लाख भाविक कालच पंढरीत दाखल झाले होते. या सगळ्यांनाच विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती. आज पहाटे महापूजेसाठी काही काळ दर्शनाची रांग थांबवण्यात आली आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासोबत विठूरायाची पूजा केली. महापूजेनंतर वारकऱ्यांनी विठुमाऊलीचं साजिरं रूप डोळ्यात साठवून घेतलं आणि लेकरांवर कृपा ठेवण्याची साद घातली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज