अ‍ॅपशहर

​ सोलापुरात योग्य नोदींची वानवा

सोलापूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी बँकाबरोबरच खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती शेतकऱ्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून शेतीसाठी कर्जे घेतली आहे. मात्र, तशी नोंद मात्र, कुठेच दिसून येत नाही. दुसरीकडे ३३ शेतकऱ्यांच्या सावकारांनी हडपलेल्या जमिनी त्यांना परत देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Times 12 Jul 2017, 11:16 pm
सूर्यकांत आसबे, सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम west maharashtra meny lander agri loan
​ सोलापुरात योग्य नोदींची वानवा

सोलापूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी बँकाबरोबरच खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती शेतकऱ्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून शेतीसाठी कर्जे घेतली आहे. मात्र, तशी नोंद मात्र, कुठेच दिसून येत नाही. दुसरीकडे ३३ शेतकऱ्यांच्या सावकारांनी हडपलेल्या जमिनी त्यांना परत देण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण १ हजार ३६६ परवानाधारक सावकाराची संख्या आहे. आजअखेर एकाही शेतकऱ्यांने त्यांच्याकडून कृषी कर्ज घेतलेले नाही. बिगर कृषी कर्ज घेतलेल्या कर्जदारांची संख्या २६ हजार २४१ इतकी असून, त्यांनी सुमारे ३० कोटी २ लाख १७ हजाराची कर्जे घेतली आहेत. तारणी कर्जदारांची संख्या २१ हजार ८५ इतकी असून, सुमारे २३ कोटी ७० लाख ९७ हजारांची कर्जे देण्यात आली आहेत. बिगर तारणी कर्जदारांची संख्या ५ हजार १५६ असून, त्यांनी ६ कोटी ३१ लाख २० हजाराची कर्जे घेतली आहेत. सावकरांकडून अनेक शेतकऱ्यांनी कर्जे घेतली आहेत, पण त्यांची कृषी कर्ज म्हणून नोंद नाही.
२४ अवैध सावकारांवर गुन्हे दाखल
सोलापुरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ या ठिकाणी तक्रारी आल्यानंतर एकूण ३८ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. पुरावे आढळून आलेल्या २४ अवैध सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर शहरात सर्वाधिक २४ धाडी घालण्यात आल्या ज्यामध्ये १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर शहरात सर्वाधिक ६४२ सावकार आहेत.
३३ शेतकऱ्यांना ३६ हेक्टर जमीन परत
सोलापूर जिल्ह्यात सावकारी अधिनियमन अंतर्गत सावकारीबाबत एकूण १२६ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामध्ये ४३ प्रकरणाचा निकाल देऊन संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना ३६.६९ हेक्टर जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात आली. दोन प्रकरणे निर्णयास्तव बंद असून, उर्वरित ८३ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज