अ‍ॅपशहर

दोन चिमुरड्यांना मारून आईची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून ३० वर्षांच्या एका महिलेनं स्वत:च्या दोन मुलांचा गळा दाबून खून करून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथे ही घटना घडली आहे.

Maharashtra Times 8 Feb 2017, 11:34 am
सुनील दिवाण । पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women suicides after killing her two childrens
दोन चिमुरड्यांना मारून आईची आत्महत्या


आजारपणाला कंटाळून ३० वर्षांच्या एका महिलेनं स्वत:च्या दोन मुलांचा गळा दाबून खून करून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथे ही घटना घडली आहे.

मनीषा घाडगे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. मनीषा घाडगे हिचे पती दत्तात्रय घाडगे शेतकरी आहेत. मनीषा ही गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. वारंवार उपचार करूनही त्रास कमी होत नसल्यानं तिला नैराश्य आलं होतं. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. घरातील लोक शेतात गेल्यावर एकटी असताना तिनं आपला ४ वर्षाचा मुलगा आप्पासाहेब आणि एक वर्षाची मुलगी रेणुका हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाडगे यांच्या घरातून संध्याकाळी धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी दार तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा मनीषा हिने फास लावून घेतल्याचे व तिच्या शेजारी दोन्ही मुले मृतावस्थेत पडून असल्याचं आढळून आलं. शेजाऱ्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आज पहाटे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून मुलांचा मृतदेह व्हिसेरा तपासणीसाठी पाठवून दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज