अ‍ॅपशहर

अंबरनाथमध्ये ८७ इमारती धोकादायक!

मान्सून सुरू होण्याआधी नगरपारिषदेकडून जाहीर होणाऱ्या धोकादायक इमारतींच्या यादीत अंबरनाथमधील तब्बल ८७ इमारतींनी स्थान मिळवले आहे. शहरातील धोकादायक इमारतींची नावे जाहीर करतानाच, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया राबवणेही अपेक्षित असते. मात्र अंबरनाथ नगरपरिषद शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा देत, दरवर्षी या इमारतींच्या मोजणीची यादी जाहीर करण्यातच समाधान मानत आहे.

Maharashtra Times 11 Apr 2017, 12:24 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम  buildings dangerous in ambarnath
अंबरनाथमध्ये ८७ इमारती धोकादायक!


मान्सून सुरू होण्याआधी नगरपारिषदेकडून जाहीर होणाऱ्या धोकादायक इमारतींच्या यादीत अंबरनाथमधील तब्बल ८७ इमारतींनी स्थान मिळवले आहे. शहरातील धोकादायक इमारतींची नावे जाहीर करतानाच, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया राबवणेही अपेक्षित असते. मात्र अंबरनाथ नगरपरिषद शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा देत, दरवर्षी या इमारतींच्या मोजणीची यादी जाहीर करण्यातच समाधान मानत आहे.

अंबरनाथ शहरात नव्या इमारती उभ्या राहत असल्या तरी शहरात धोकादायक इमारतींचीही संख्या लक्षणीय आहे. पावसाळ्यात उपनगरात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असते. मागील काही वर्षांत अंबरनाथमध्येही धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. मागील वर्षी ७३ असलेल्या धोकादायक इमारतींमध्ये यंदा १४ इमारतींची भर पडल्याने धोकादायक इमारतींची संख्या ८७ झाली आहे. यातील अंबरनाथ पूर्व भागातील प्लॉट नंबर ४३, रोटरी शाळेच्या बाजूला असलेल्या इमारतीवर पालिकेने आपला पहिला हातोडा मारला. ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तर, दोन महिन्यांपूर्वी नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या दोन धोकादायक इमारती पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. मात्र त्यानंतर शहरातील अन्य कोणत्याही धोकादायक इमारती जमीनदोस्त किंवा इतर कारवाई करण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने केलेली नाही. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करत त्यावर योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. मात्र अंबरनाथ पूव आणि पश्चिम अशा दोन्ही भागांमध्ये धोकादायक स्थितीत इमारती उभ्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास या इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालिकेचे संबंध‌ति अधिकारी मात्र केवळ पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या यादीतील धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यातच समाधान मानत आहे.

शहरातील धोकादायक इमारतींचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. गेल्या सहा महिन्यांत आम्ही पालिकेच्याच दोन इमारती आणि एक खासगी इमारत जमीनदोस्त केली. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींचे लवकरच सर्वेक्षण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

गणेश देशमुख, मुख्याधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज