अ‍ॅपशहर

१०६ वर्षीय आजीची करोनावर मात

करोनाची लागण होताच धास्ती घेणाऱ्या नागरिकांचा हुरूप वाढविणारी घटना कल्याण डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीतील १०६ वर्षीय आनंदीबाई पाटील या आजीबाईंनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 21 Sep 2020, 12:41 pm
म. टा. वृत्तसेवा कल्याण : करोनाची लागण होताच धास्ती घेणाऱ्या नागरिकांचा हुरूप वाढविणारी घटना कल्याण डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीतील १०६ वर्षीय आनंदीबाई पाटील या आजीबाईंनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. उपचाराअंती करोनामुक्त होऊन पुन्हा घरी परतणाऱ्या आजींच्या चेहऱ्यावरील आनंद इतराचा हुरूप वाढवणारा असून या यशामुळे प्रशासनाकडून मागील सहा महिन्यांत करोनाच्या साथीत केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम १०६ वर्षीय आजीची करोनावर मात


डोंबिवलीतील आनंदीबाई पाटील या १०६ वर्षीय आजींना करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. अखेर पालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील करोना समर्पित रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यात आले. आजीबाईंच्या वयानुसार त्यांना झेपतील असे योग्य ते उपचार करत रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांच्या पथकाने त्यांना करोनामुक्त केले. रविवारी १० दिवसांच्या उपचारानंतर आनंदीबाई यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोना साथीत अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉक्टर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकीकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण असताना १०६ वर्षांच्या आजीबाईंनी करोनाला मात केल्याने यातून रुग्णांना करोनाविरोधात लढण्यासाठी प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज