अ‍ॅपशहर

शहरात २८ ठिकाणे शांतता क्षेत्र

उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या मान्यतेने कल्याण डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरातील २८ ठिकाणांची शांतता क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणाभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

Maharashtra Times 3 Aug 2018, 4:52 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम joshi-bedekar-college


उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या मान्यतेने कल्याण डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरातील २८ ठिकाणांची शांतता क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणाभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी नागरिकांनी ध्वनिपातळीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम,२००० च्या अनुषंगाने मुख्य नियमांच्या नियम ३(२)अन्वये विविध क्षेत्रांसाठी ध्वनिमानकांच्या प्रयोजनासाठी औद्योगिक,व्यावसायिक, निवासी व शांतता क्षेत्र असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानुसार राज्य सरकार पालिका क्षेत्रातील शांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने शांतता क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे.

कामगार रुग्णालय वागळे इस्टेट (शांतता), बेथनी रुग्णालय पोखरण रोड नं. २(औद्योगिक), वेदांत रुग्णालय ओवळा(रहिवासी), सफायर रुग्णालय कावेरी हाइट, खारेगाव (रहिवासी),ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालय लि. पूर्व द्रुतगती महामार्ग (औद्योगिक), ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (शांतता), जिल्हा सामान्य रुग्णालय, उथळसर(शांतता), सेट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, जांभळी नाका (शांतता), माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मराठी/हिंदी/इंग्लिश हायस्कूल, माजिवडा(रहिवासी), ज्ञानसाधना ज्युनिअर कॉलेज, परबवाडी(शांतता), एम. एच. मराठी हायस्कूल शिवाजी पथ, नौपाडा (शांतता), ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर(औद्योगिक),अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा, मुंब्रा(रहिवासी), अब्दुल्ला पटेल हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, नागसेन नगर(रहिवासी), न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल, कावेसर (शांतता), भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, सावरकर नगर(शांतता), सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पातलीपाडा(रहिवासी), हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल हिरानंदानी इस्टेट(रहिवाशी), लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, वर्तकनगर(शांतता), वसंत विहार इंग्लिश हायस्कूल, वसंत विहार(शांतता), सिंघानिया स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज पोखरण रोड नं.१(शांतता), डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल तत्त्वज्ञान विद्यापीठासमोर (शांतता), जनविकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळवा(शांतता), विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय(शांतता), ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ३१/४० शिमला पार्क(शांतता), आणि ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट नाका (शांतता) या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज