मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
ठाण्यातील लोकमान्यनगर येथील एअर फोर्सच्या फायरिंग रेंजच्या परिसरात वीज पडल्यामुळे सीआयएसएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. यातील एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद इक्बाल (३२), ज्योतिनाथ (२८), मुकेश कुमार (२८) अशी जखमी जवानांची नावे असून या तिघांनाही पोखरण रोड नंबर- २ येथील बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील मोहम्मद इक्बाल हा गंभीर जखमी असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
हे तिघेही जवान कलिना, मुंबई येथील असून फायरिंग रेंजवर सराव करत असतानाच दुपारी २.४०च्या सुमारास वीज कोसळून ही दुर्घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.