वसई : वसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात १५ करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोना रुग्णसंख्या ३५५वर पोहोचली आहे. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वसई पूर्वेकडील चार, वसई पश्चिमेकडील एक, नालासोपारा पूर्वेकडील सात, विरार पश्चिमेकडील एक आणि विरार पूर्वेकडील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर, नालासोपारा पूर्वेकडील ५८ वर्षीय आणि ५५ वर्षीय अशा दोन करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत रुग्णांची संख्या १५वर पोहोचली आहे. एकूण २९ रुग्ण हे करोनामुक्त झाले असून १४० जणांवर उपचार सुरू आहेत.
वसई-विरारमध्ये ३५५ करोनाबाधित
वसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात १५ करोनाबाधित आढळले आहेत त्यामुळे एकूण करोना रुग्णसंख्या ३५५वर पोहोचली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2020, 4:00 am